Add parallel Print Page Options

शलमोनाची नीतिसूत्रे

10 ही शलमोनाची नीतिसूत्रे (शहाणपणाच्या गोष्टी) आहेत शहाणा मुलगा त्याच्या वडिलांना सुखी करतो.

पण मूर्ख मुलगा त्याच्या आईला अतिशय दु:खी करतो.

जर एखाद्याने वाईट गोष्टी करुन पैसे मिळवले तर ते पैसे कवडी मोलाचे असतात. पण सत्कर्म तुम्हाला मरणापासून वाचवू शकते.

परमेश्वर चांगल्या लोकांची काळजी घेतो. तो त्यांना हवे असलेले अन्न देतो. परंतु परमेश्वर वाईट लोकाक़डून त्यांना हव्या असलेल्या गोष्टी काढून घेतो.

आळशी माणूस गरीब राहील. पण जो माणूस कष्ट करील तो श्रीमंत होईल.

हुशार मुलगा योग्य वेळी धान्य गोळा करतो. पण हंगामाच्या वेळी झोपणारा आणि धान्य गोळा न करणारा मुलगा लाज आणतो.

लोक देवाला चांगल्या माणसाला आशीर्वाद द्यायला सांगतात. वाईट लोक त्या चांगल्या गोष्टी म्हणतील परंतु त्यांचे शब्द त्यांच्या वाईट योजना [a] फक्त लपवतात.

चांगली माणसे चांगल्या आठवणी मागे ठेवतात. पण वाईट माणसे लवकर विसरली जातात.

चांगला, इमानी माणूस सुरक्षित असतो. परंतु कुटिल, फसवणारा माणूस मात्र पकडला जातो.

शहाण्या माणसाला जर एखाद्याने काही करायला सांगितले तर तो त्या आज्ञा पाळतो. परंतु मूर्ख माणूस वाद घालतो आणि स्वतःवर संकट ओढवून घेतो.

10 जो माणूस सत्य लपवतो तो संकटे निर्माण करतो. जो माणूस उघडपणे बोलतो तो शांती [b] निर्माण करतो.

11 चांगल्या माणसाच्या शब्दांमुळे आयुष्य चांगले होते. पण दुष्टाच्या शब्दांतून त्याच्या मनातला वाईटपणा तेव्वढा दिसतो.

12 मत्सरामुळे वादविवाद होतात. पण प्रेम लोकांनी केलेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला क्षमा करते.

13 शहाणे लोक ऐकायला योग्य अशा गोष्टी बोलतात. पण मूर्ख लोकांनी सुधारावे म्हणून त्यांना शिक्षा करायला हवी.

14 शहाणे लोक शांत असतात आणि नवीन गोष्टी शिकतात. पण मूर्ख लोक बोलतात आणि संकटे ओढवून घेतात.

15 संपत्ती श्रीमंत माणसाचे रक्षण करते आणि गरिबी गरिबांचा नाश करते.

16 जर एखाद्याने चांगले कृत्य केले तर त्याला बक्षीस मिळते. त्याला आयुष्य दिले जाते. पण दुष्टावा केवळ शिक्षा आणतो.

17 जो माणूस शिक्षेपासून काही शिकतो तो इतरांनासुध्दा जगायला शिकवू शकतो. पण जो माणूस शिकायला नकार देतो तो लोकांना चुकीच्या मार्गाने नेतो.

18 जो माणूस त्याचा मत्सर लपवतो तो खोटे बोलत असतो. पण केवळ मूर्खच पसरवता येण्यासारख्या अफवा शोधण्याचा प्रयत्न करतो.

19 जो माणूस खूप बडबड करतो तो संकंटांना आमंत्रण देतो. शहाणा माणूस गप्प राहायला शिकतो.

20 चांगल्या माणसाचे शब्द शुध्द चांदीसारखे असतात. पण दुष्ट माणसाचे विचार कवडीमोलाचे असतात.

21 चांगल्या माणसांच्या शब्दांमुळे अनेकांना मदत होते. पण मूर्खाची मूर्खता त्यालाच मारु शकते.

22 परमेश्वराच्या आशीर्वादाने तुला खरी संपत्ती मिळेल. आणि ती आपल्याबरोबर संकटे आणणार नाही.

23 मूर्ख माणसाला चुका करायला आवडते. परंतु शहाणा माणूस ज्ञानाने खुश होतो.

24 दुष्ट माणसाला ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टींकडूनच त्याचा पराभव होतो. पण चांगल्या माणसाला मात्र हव्या असलेल्या गोष्टी मिळतात.

25 दुष्टांचा नाश त्यांच्या संकटांमुळे होतो. पण चांगली माणसे नेहमी बलवान राहातात.

26 आळशी माणसाला तुमच्यासाठी, काहीही करायला सांगू नका. तुमच्या तोंडात शिरलेल्या आंबेप्रमाणे किंवा डोळ्यांत गेलेल्या धुराप्रमाणे तो तुम्हाला चीड आणील.

27 जर तुम्ही परमेश्वराचा आदर करीत असाल तर तुम्ही खूप जगाल. पण दुष्टाची त्याच्या आयुष्यातली अनेक वर्षे कमी होतील.

28 चांगले लोक ज्या गोष्टींची आशा करतात त्या त्यांना आनंद मिळवून देतात. ज्या गोष्टींची आशा वाईट लोक करतात त्या त्यांना विनाश आणतात.

29 परमेश्वर चांगल्या माणसांचे रक्षण करतो. पण जे लोक चुका करतात त्यांचा परमेश्वर नाश करतो.

30 चांगले लोक नेहमी सुरक्षित असतात. पण दुष्टांना जबरदस्तीने देश सोडणे भाग पडते.

31 चांगले लोक शहाणपणाच्या गोष्टी सांगतात. पण जो संकटे आणणाऱ्या गोष्टी सांगतो त्याचे ऐकणे लोक बंद करतात.

32 चांगले लोक बोलण्याच्या योग्य गोष्टी जाणतात. पण वाईट लोक संकटे आणणाऱ्या गोष्टीच बोलतात.

Footnotes

  1. नीतिसूत्रे 10:6 वाईट लोक … वाईट योजना “हिंसाचार दुष्ट लोकांचा चेहरा झाकून टाकेल.”
  2. नीतिसूत्रे 10:10 माणूस … शांतता हे प्राचीन ग्रीक भाषांतरावरुन आले आहे.हिब्रूत आठव्या कडव्याचा उत्तरार्ध पुन्हा वापरला आहे.