Menu
Bible Gateway Plus logo
Bible Gateway logo
account
Welcome to the new Bible Gateway. Take a quick tour and see what’s new.
Bible Gateway Plus logo
Bible Gateway logo
Verse of the Day by email. Sign up free.
  • Read
    • Reading Plans
    • Advanced Search
    • Available Versions
    • Audio Bibles
  • Study
    • Scripture Engagement
    • More Resources
  • News
  • Explore
    • Newsletters
    • Devotionals
    • Bible Gateway App
    • Bible Audio App
    • Take a Tour
  • Store
    • Bibles
    • Deals
    • More
  • Bible Gateway Plus
ERV-MR
Version
Bible Books Bible Books
ERV-MR
Version
Read
Study
News
Explore
Store
Bible Gateway Plus
Light Mode Dark Mode
Font Size
Log In show menu
Previous Next
Print PrintSettingsSettingsShare ShareParallelParallelExpandExpandCollapse

निर्गम 12  Marathi Bible: Easy-to-Read Version

वल्हांडण

12 मोशे व अहरोन अद्याप मिसरमध्ये असताना परमेश्वर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, 2 “हा तुमच्या वर्षाचा पहिला महिना असे. [a] 3 ही आज्ञा इस्राएलच्या सर्व जनसमूहासाठी आहे; ह्या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रत्येक माणसाने आपल्या कुटुंबातील माणसाकरिता एक कोकरा घ्यावा. 4 जर तो संपूर्ण कोकरा, घरातील माणसांना सरणार नसेल तर त्याने आपल्या भोजनात वाटेकरी होण्यासाठी आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना निमंत्रण द्यावे. 5 तो कोकरा, एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निरोगी असावा तो कोकरा मेंढ्यातला किंवा बकऱ्यातला असावा. 6 ह्या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत त्या मेढ्याची किंवा बकऱ्याची निगा राखावी व त्यावर लक्ष ठेवावे. चौदाव्या दिवशी सर्व इस्राएल लोकांनी कातरवेळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर व अंधार पडण्यापूर्वी आपापल्या मेंढ्याचा किंवा बकऱ्याचा वध करावा. 7 त्यांचे रक्त गोळा करून ते ज्या घरात त्याचे मांस खाणार आहेत त्याच्या दाराच्या कपाळ पट्ट्यांवर व दोन्ही बाजूंच्या चौकटींना लावावे.

8 “त्याच रात्री तो मेंढा किंवा बकरा विस्तावावर भाजावा आणि कडू भाजी व बेखमीर भाकरी बरोबर त्याचे सर्व मांस खाऊन टाकावे; 9 तुम्ही त्याचे मांस कच्चे किंवा पाण्यात शिजवून खाऊ नये तर विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतंडी ही सुद्धा भाजून खावीत. 10 त्या रात्रीच ते सर्व मांस खावे; त्यातले काहीही सकाळपर्यंत ठेवू नये आणि जर काही उरलेच तर ते आगीत जाळून टाकावे.”

11 ते खाण्या अगोदर तुम्ही प्रवासास जाण्याच्या तयारीने अंगावर कपडे घालावेत, पायात जोडे घालावेत आणि हातात काठी घ्यावी आणि मग घाईघाईने ते मांस खावे; कारण हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.

12 “आज रात्री मी मिसर देशभर फिरेन आणि त्यातील प्रथम जन्मलेल्या मुलांना व जनावरांतील नरांना मी मारून टाकीन, आणि मिसरमधील सर्व दैवतांना धडा शिकवून दाखवीन की मी परमेश्वर आहे. 13 परंतु तुमच्या घरांच्या दारावरील रक्त ही एक विशेष खूण असेल. मी जेव्हा ती पाहीन तेव्हा ते घर ओलांडून मी पुढे जाईन. मी मिसरच्या लोकांना मारीन तेव्हा कोणतीही विनाशकारी पीडा तुम्हांवर येणार नाही व तुम्हाला अपाय करणार नाही.

14 “अशा रीतीने आजची रात्र कायमची तुमच्या आठवणीत राहील. हा दिवस तुम्हासाठी विशेष उत्सवाचा म्हणजे सणाचा दिवस असेल. तुमच्या वंशजांनी येथून पुढे हा सण पिढ्यानपिढ्या कायमचा नियम म्हणून पाळावा. 15 तसेच सणाच्या दिवासांत तुम्ही सात दिवस खमीर न घातलेली भाकर खावी; ह्या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे व पूर्ण सात दिवस तुम्ही खमीर न घातलेली भाकर खावी. तुम्हातील जर कोणी खमीर घातलेली भाकर खाईल तर त्याला तुम्ही इस्राएल लोकांमधून बाहेर टाकावे. 16 या सणाच्या पहिल्या व शेवटल्या म्हणजे सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; ह्या दोन्ही दिवशी स्वयंपाकाच्या कामाशिवाय इतर कोणतेही काम करु नये. 17 बेखमीर भाकरीच्या सणाची तुम्ही आठवण ठेवावी कारण याच दिवशी मी तुम्हा सर्वाना गटगटांनी मिसरदेशातून बाहेर काढून नेले म्हणून तुमच्या सर्व वंशाजांनी हा दिवस पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम म्हणून पाळावा. 18 तेव्हा पहिल्या महिन्यातील (निसान महिन्यातील) चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते त्या महिन्याच्या एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्या. 19 ह्या सात दिवसात तुमच्या घरात खमीर नसावे; कारण जो कोणी एखादी खमीराची वस्तू खाईल मग तो परदेशी असो किंवा स्वदेशी असो त्याला इस्राएल लोकांमधून बाहेर टाकावे. 20 या दिवशी कोणीही खमीर खाऊ नये; तर तुम्ही कोठेही राहात असला तरी बेखमीर भाकरच खावी.”

21 म्हणून मग मोशेने इस्राएली लोकांच्या सर्व वडीलधाऱ्यां लोकांना एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकएक कोकरू घ्यावे; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञाकरिता त्याचा वध करावा. 22 मग एजोब झाडाच्या पानांच्या जुड्या घेऊन त्या पात्रातील कोकराच्या रक्तात बुचकाळाव्या आणि त्याचे रक्त दाराच्या दोन्ही बाजूंच्या चौकटींना व कपाळ पट्ट्यांवर लावावे. आणि सकाळपर्यंत कोणीही घराबाहेर जाऊ नये. 23 कारण त्यावेळी परमेश्वर मिसरमधील प्रथम जन्मलेल्यांना ठार मारण्यासाठी फिरणार आहे; तो जेव्हा घराच्या दारावरील कपाळ पट्टीवर व दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला लावलेले रक्त पाहील तेव्हा तो त्या घराचे संरक्षण करील; नाश करणाऱ्याला तुमच्या घरात प्रवेश करु देणार नाही, व तुम्हाला काही अपाय होऊ देणार नाही. 24 तुम्ही या आज्ञेची आठवण ठेवली पाहिजे की तुम्ही व तुमचे वंशज यानी पाळावयासाठी हा नियम कायमचा नियम आहे. 25 परमेश्वर त्याच्या वचनानुसार जो देश तुम्हाला देणार आहे त्यात तुम्ही गेला तर तेथेही तुम्ही हा नियम पाळण्याची आठवण ठेवावी. 26 जेव्हा तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील की ‘हा विधी आपण का करीत आहोत?’ 27 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, ‘हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; कारण आम्ही जेव्हा मिसरमध्ये होतो तेव्हा या दिवशी परमेश्वराने मिसरच्या लोकांना मारले परंतु इस्राएल लोक राहात असलेली घरे ओलाडूंन तो पुढे गेला व त्या घरातील आम्हा सर्वाना त्याने वाचवले त्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन त्याची उपासना केली.’”

28 परमेश्वाने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिली होती म्हणून इस्राएल लोकांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले.

29 मध्यरात्री परमेश्वराने मिसरमधील सर्व प्रथम जन्मलेले मुलगे. म्हणजे मिसरदेशाचा राजा फारो याच्या थोरल्या मुलापासून तर तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या थोरल्या मुलापर्यत सर्व मुलांना तसेच पशूंच्या प्रथम जन्मलेल्या सर्व नरांना मारून टाकले. 30 त्या रात्री अवघ्या मिसर देशातील अगदी प्रत्येक घरातून एक ना एकजण तरी मरण पावला. फारो राजा, त्याचे सेवक आणि मिसरचे लोक मोठमोठ्याने रडून शोक करु लागले.

इस्राएल लोक मिसर देश सोडून जातात

31 तेव्हा रात्रीच्या रात्रीच फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले, फारो त्यांना म्हणाला, “आता उठा आणि आमचे लोक सोडून निघा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही व तुमचे लोक निघून जा आणि तुमच्या परमेश्वराची उपासना करा. 32 आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुमची शेरमेंढरे, व गुरेढोरे ही तुमच्या बरोबर घेऊन जा. येथून निघा! आणि जाताना मलाही आशीर्वाद द्या!” 33 मिसरच्या लोकांनी सुद्धा इस्राएल लोकांना घाईकरून लवकर निघून जाण्यास सांगितले; कारण ते म्हणाले, “तुम्ही जर येथून निघून जाणार नाही तर आम्ही सर्वजण मरून जाऊ!”

34 इस्राएल लोकांना आपल्या भाकरीच्या पिठात खमीर घालण्यास बिलकुल वेळ मिळाला नाही म्हणून त्यांनी मळलेल्या पिठाच्या काथवटी कापडात गुंडाळल्या आणि त्या आपल्या खांद्यावर टाकून ते घेऊन गेले. 35 इस्राएल लोकांनी मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे आपल्या मिसरच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जाऊन भारी भारी कपडे. सोन्याचांदीचे दागदागिने मागून घेतले होते. 36 मिसरच्या लोकांनी इस्राएल लोकांना त्या त्या वस्तू दयाव्यात म्हणून त्यांच्या मनात परमेश्वराने इस्राएल लोकांविषयी दया निर्माण केली आणि म्हणून मिसरच्या लोकांनी इस्राएल लोकांना मौल्यवान वस्तू दिल्या.

37 तेव्हा इस्राएल लोक मिसरमधून निघून रामसेस येथून प्रवास करीत सुक्कोथ येथे गेले. मुलेबाळे सोडून ते सर्वजण मिळून सुमारे सहा लाख होते. 38 त्यांच्या सोबत पुष्कळ शेरडेमेंढरे व गुरेढोरे होती. अनेक प्रकारचे लोक त्यांच्याबरोबर प्रवास करीत होते, ते इस्राएली नव्हते परंतु त्यांनी त्याच्या बरोबर मिसर देश सोडला. 39 इस्राएल लोकांस आपल्या भाकरीच्या पिठात खमीर घालण्यास अजिबात वेळ मिळाला नाही. तसेच आपल्याबरोबर प्रवासाकरिता खावयास काही विशेष जेवण करता आले नाही; म्हणून त्यांना बेखमीर भाकरीच भाजाव्या लागल्या.

40 इस्राएली लोक मिसरमध्ये चारशेतीस वर्षे राहिले होते. 41 मग चारशे तीसव्या वर्षातील अगदी शेवटच्या दिवसापर्यंत राहिल्यानंतर परमेश्वराच्या सर्व सेना म्हणजे सर्व इस्राएल लोक मिसर देशातून निघाले. 42 म्हणून ज्या रात्री त्यांनी मिसरदेश सोडला त्या रात्री परमेश्वराने त्यांच्या करिता काय केले त्याविषयी त्या विशेष रात्रीची त्यांना आठवण राहील. सर्व इस्राएल लोकांनी त्या रात्रीची आठवण अगदी पिढ्यान् पिढ्या ठेवावी.

43 परमेश्वराने मोशे व अहरोन यांना सांगितले, “वल्हांडण सण पाळण्याविषयीचे नियम असे आहेत. कोणाही परदेशी माणसाने वल्हांडणाचे भोजन खाऊ नये. 44 परंतु जर कोणी एखादा गुलाम विकत घेतला असेल आणि त्याची सुंता त्याने करवून घेतली असेल तर मग त्या गुलामाने वल्हांडणाचे भोजन खावे; 45 परंतु केवळ तुमच्या देशात राहणारा उपरा माणूस किंवा मोलकरी ह्यापैकी कोणीही ते खाऊ नये. (कारण वल्हांडण सण फक्त इस्राएल लोकांसाठीच आहे.)

46 “प्रत्येक इस्राएली कुटुंबाने आपले वल्हांडण सणाचे भोजन एकाच घरात खाल्ले पाहिजे; ते भोजन घराबाहेर नेऊ नये. यज्ञपशूचे कोणतेही हाड मोडू नये. 47 सर्व इस्राएल लोकांनी हा सण पाळलाच पाहिजे. 48 इस्राएली नसलेला कोणी एक जण तुम्हांबरोबर राहात असेल व जर त्याला परमेश्वराच्या वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी होण्याची इच्छा असेल तर त्याने सुंता करून घेतलीच पाहिजे. म्हणजे मग तो इस्राएल लोकांसारखा रहिवासी होईल. मग त्याने वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी व्हावे; परंतु त्याने सुंताकरून घेतली नाही तर त्याला वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी होता येणार नाही. 49 हे नियम सर्वासाठी सारखेच आहेत, मग तो इस्राएली असो किंवा तुमच्या देशात राहणारा इस्राएली नसलेला कोणी परदेशी असो. प्रत्येकासाठी सारखेच नियम आहेत.”

50 तेव्हा परमेश्वराने मोशे व अहरोन यांना ज्या आज्ञा दिल्या त्या सर्व इस्राएली लोकांनी पाळल्या. 51 अशा रीतीने त्याच दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर नेले व ते गटगटांनी गेले.

Footnotes

  1. निर्गम 12:2 पहिला महिना असे अबाब हा महिना होय तो साधारणपणे असेल मार्चच्या मध्यापासून एप्रिलच्या मध्यापर्यंत येत असे.
Next
निर्गम 11
निर्गम 13
Next
dropdown
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by Bible League International

Bible Gateway Plus logo
Bible Gateway logo

Font Size

Font Size

Dark Mode

Light Mode Dark Mode

About

  • About
  • Learn About the Bible
  • Statement of Faith
  • Mobile App
  • Store
  • Blog
  • Newsroom
  • Support Us

Help

  • FAQs
  • Tutorials
  • Use Bible Gateway on Your Site
  • Advertise with us
  • Contact us
  • Privacy policy
  • California Privacy Rights
  • Do Not Sell My Personal Information
  • Site: Terms of use
  • Widget: Terms of use

Our Network

  • FaithGateway
  • StudyGateway
  • ChurchSource
  • HarperCollins Christian Publishing
  • Grupo Nelson
  • Editorial Vida
  • Thomas Nelson
  • WestBow Press
  • Zondervan
  • MasterLectures

Social

  • Facebook
  • Instagram
  • Pinterest
  • TikTok
  • X
  • YouTube

Preferences

  • Versión en español
  • Preferences
  • Classic Bible Gateway
Sign Up for Bible Gateway: News & Knowledge
Get weekly Bible news, info, reflections, and deals in your inbox.

By submitting your email address, you understand that you will receive email communications from Bible Gateway, operated by HarperCollins Christian Publishing, 501 Nelson Pl, Nashville, TN 37214 USA, including commercial communications and messages from partners of Bible Gateway. You may unsubscribe from Bible Gateway’s emails at any time. If you have any questions, please review our Privacy Policy or email us at privacy@biblegateway.com.

Preferences

  • Versión en español
  • Preferences
  • Classic Bible Gateway