A A A A A
Bible Book List

दानीएल 8 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

मेंढा व बोकड यांच्याबाबतचा दानीएलचा दृष्टान्त

बेलशस्सर राजाच्या कारकिर्दोच्या तिसऱ्या वर्षी. [a] मला हा दृष्टान्त झाला. हा दृष्टान्त मलाच झाला. दुसऱ्या दृष्टान्तानंतर तो मला झाला. दृष्टान्त मी पाहिले की मी शशन शहरात आहे. शूशन ही एलाम परगण्याची राजधानी आहे. मी उलई नदीच्या काठी उभा होतो. मी वर पाहिले तर मला एक मेंढा त्या नदीकाठी उभा असलेला दिसला. त्याला दोन लांब शिंगे होती. पण एक दुसऱ्यापेक्षा अधिक लांब होते, जास्त लांब शिंग दुसऱ्यापेक्षा काहीसे मागे होते. मी पाहिले की मेंढा आपल्या शिंगांच्या साहाय्याने कोणत्याही वस्तूंना टक्कर देत होता. तो पश्चिमेकडे, उत्तरेकडे व दक्षिणेकडे पळताना मी पाहिला, त्याला कोणी प्राणी थोपवू शकत नव्हता, व कोणीही दुसऱ्या प्राण्याला वाचवू शकत नव्हता. मेंढा आपल्या मनाप्रमाणे करीत होता. तो खूपच शक्तिशाली झाला होता.

मी मेंढ्याचा विचार करीत होतो. तोच पशिचमेकडून एक बोकड आला. तो सर्व पृथ्वीभर धावत होता. त्याचे खर मूळी जमिनीवर टेकतच नव्हते. ह्या बोकडाला डोव्व्यांच्या बरोबर मध्यावर सहज दिसू शकेल असे एक शिंग होते.

तो बोकडे, मी उलई नदीच्या काठी पाहिलेल्या, दोन शिंगे असलेल्या मेंढ्याजवळ आला. बोकड खूपच रागावलेला होता. तो मेंढ्याच्या अंगावर धावला. बोकडाला मेंढ्याच्या अंगावर जाताना मी पाहिले. बोकड फारच चिडला होता. त्याने मेंढ्याची दोन्ही शिंगे मोडली. मेंढा बोकडाला थोपवू शकला नाही.बोकडाने मेंढ्याला जमिनीवर लोळविले, त्याने मेंढ्याला तुडविले. बोकडापासून मेंढ्याला सोडवू शकेल असा तेथे कोणीही नव्हता.

मग बोकड खूपच शक्तिशाली झाला, पण तो बलिष्ठ होताच त्याचे मोठे शिंग मोडले व त्या जागी चार शिंगे उगवली. ती सहज दिसण्यासारखी होती. त्यांची टोके चार दिशांना होती.

मग त्या चार शिंगातील एकातून एक लहान शिंग उगवले आणि खूप मोठे झाले. ते नैऋ त्या दिशेने वाढले. ते सुंदर प्रदेशांच्या दिशेने वाढले. 10 ते लहान शिंग खूप मोठे झाले. ते आकाशाला भिडेपर्यंत वाढले. एवढेच नाही. तर त्याने काही ताऱ्यांना जमिनीवर फेकले व त्यावर ते नाचले. 11 ते खूप शक्तिशाली झाले. मग ते ताऱ्यांच्या राजाच्या (देवाच्या) विरुद्ध गेले. त्याने राजाला (देवाला) दररोज ठरलेले बळी देण्याचे बंद केले. लोक जेथे राजाची उपासना करीत ती जागा त्याने पाडून टाकली. 12 लहान शिंगाने पाप केले. रोजचे बळी देण्याची पध्दत मोडली. त्याने चांगुलपणा धुळीला मिळविला. लहान शिंगाने असे करून चांगले यश मिळविले.

13 मग मी एक पवित्र आवाज बोलताना ऐकला. त्याला दुसऱ्या पवित्र आवाजाने उत्तर दिले. पहिला आवाज म्हणाला, “नित्याच्या बळींचे काय होणार हे ह्या दृष्टान्तावरून दिसते. सर्वनाश करणाव्या पापाबद्दल हा दृष्टान्त आहे. राजाला लोक जेथे पूजतात, त्या जागेचा नाश झाल्यास काय होईल, हेच ह्याव ताऱ्रून दिसते. लोकांनी ती जागा पायाखाली तुडविल्यावर काय होईल हे ह्यावरून समजते. लोक यांवरून चालल्यावर. काय होईल, हेही कळून येते. पण हे किती वेळ चालेल?”

14 दूसरा पवित्र आवाज म्हणाला “हे 2,300 दिवस चालेल मग पवित्र जागा परत उभी केली जाईल.”

दानीएलला दृष्टान्ताचा अर्थ सांगितला जातो

15 मी, दानीएलने, हा दृष्टान्त पाहून, त्याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न केला. मी ह्या दृष्चान्ताबद्दल विचार करीत असतानाच एक माणसाप्रमाणे दिसणारी आकृती माझ्यासमोर येऊन उभी राहिली. 16 मग मला माणसाचा आवाज ऐकू आला. तो उलई नदीवरून आला, तो आवाज मोठ्याने म्हणाला, “गाब्रीएल ह्या माणसाला दृष्टान्ताचा अर्थ स्पष्ट कर.”

17 मग माणसाप्रमाणे दिसणारा गाब्रीएल देवदूत माझ्याजवळ आला. मी खूप घाबरलो. मी जमिनीवर पडलो. पण गाब्रीएल मला म्हणाला, “मुला हा दृष्टान्त क्रोधाच्या शेवटच्या वेळेसंबंधी आहे हे समजून घे.”

18 गाब्रीएल बोलत असताना मी जमिनीवर पडलो व झोपी गेलो. मला अगदी गाढ झोप लागली. मग गाब्रीएलने मला स्पर्श केला व माझ्या पायावर उभे केले. 19 गाब्रीएल म्हणाला, “आता मी तुला दृष्टान्ताचा अर्थ सांगतो. भविष्यात काय घडणार हे मी तुला सांगतो. तुझा दृष्टान्त क्रोधाच्या शेवटच्या वेळेसंबंधी आहे.

20 “तू दोन शिंगे असलेला मेंढा पाहिलास. ती शिंगे म्हणजेच मेदय व पारस ही राज्ये होत. 21 बोकड म्हणजे ग्रीसचा राजा होय. त्याच्या डोव्व्यांमधील शिंग म्हणजे पहिला राजा होय. 22 ते मोडले आणि त्या जागी चार शिंगे उगवली. ती चार शिंग म्हणजे चार राज्ये होत, पहिल्या राजाच्या राष्ट्रातून ही चार राज्ये निर्माण होतील. पण पहिल्या राजाएवढी ती शक्तिशाली असणार नाहीत.

23 “त्य़ा राज्यांचा शेवट जवळ आला असताना,एक उध्दट व क्रूर राजा होईल. तो फार लबाड असेल. पातकी लोकांची दृष्कृत्ये पूर्णतेला पोहोंचल्यावर हे घडेल 24 हा राजा खूप शक्तिशाली होईल पण स्वतःच्या बळावर नव्हे, तो भयंकर संहाराला कारण होईल तो करील त्या प्रत्येक गोष्टीत त्याला यश मिळेल. तो सामर्थ्यवान लोकांचा, देवाच्या खास लोकांचासुध्दा नाश करील.

25 “हा राजा फार चलाख व लबाड असेल.तो आपल्या धूर्तपणाच्या आणि खोटेपणाच्या बळावर यश मिळवील तो स्वतःला खूप महत्वाचा समजेल. तो खूप लोकांचा अनपेक्षितपणे घात करील राजपत्रांच्या राजपुत्राशी (देवाशी) लढण्याचा तो प्रयत्न करील. पण त्या क्रूर राजाच्या सत्तेचा नाश होईल. पण त्याचा नाश करणारा हात मानवाचा नसेल.

26 “त्या काळासंबंधीचा व मी सांगितलेल्या गोष्टींसंबंधीचा दृष्टान्त खरा आहे. पण दृष्टान्त मोहोरबंद करून ठेव. (दृष्टान्त गुप्त ठेव) ह्या गोष्टी खूप काळांनंतर घडणार आहेत.”

27 मी, दानीएल, खूप गळन गेलो ह्या दृष्टान्तानंतर बरेच दिवस मी आजारी हो तो. मग मी उठून राज्याच्या कामाला लागलो. पण दृष्टान्तामुळे मी खूपच अस्वस्थ होतो. मला दृष्टान्ताचा अर्थ समजला नाही.

Footnotes:

  1. दानीएल 8:1 तिसर्या वर्ष म्हणजे ख्रि.पू. 551 मध्ये.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes