A A A A A
Bible Book List

गणना 23Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

बलामचा पहिला संदेशS

23 बलाम म्हणाला, “इथे सात वेद्या बांधा आणि माझ्यासाठी सात बैल आणि सात मेंढे तयार ठेवा.” बलामने एक मेंढा व एक बैल प्रत्येक वेदीवर मारला.

नंतर बलाम बालाकाला म्हणाला, “या वेदीजवळ थांब. मी दुसरीकडे जातो. नंतर परमेश्वर माझ्याकडे येईल आणि मी काय बोलायचे ते मला सांगेल.” नंतर बलाम उंच जागी गेला.

देव त्या जागी बलामकडे आला आणि बलाम म्हणाला, “मी सात वेद्या तयार केल्या आहेत. आणि प्रत्येक वेदीवर मी एकेक मेंढा व बैल बळी दिला आहे.”

नंतर परमेश्वराने काय बोलायचे ते बलामला सांगितले. परमेश्वर म्हणाला, “बालाकाकडे परत जा आणि मी सांगतो तेच त्याला जाऊन सांग.”

तेव्हा बलाम बालाकाकडे परत गेला. बालाक अजूनही वेदीजवळ उभा होता. आणि मवाबचे सर्व पुढारी तेथे त्याच्याजवळ उभे होते. नंतर बलामने हे सांगितले:

“पूर्वेकडच्या अराम पर्वतावरुन मवाबचा
    राजा बालाक याने मला येथे आणले.
बालाक मला म्हणाला,
    ‘ये, माझ्यासाठी याकोब विरुद्ध बोल.
    ये इस्राएल लोकांविरुद्ध बोल.’
पण देव त्या लोकांच्या विरुद्ध नाही.
    म्हणून मी देखील त्यांच्या विरुद्ध बोलू शकत नाही.
परमेश्वराने त्यांचे काही वाईट व्हावे असे म्हटले नाही
    म्हणून मी सुद्धा तसे करु शकत नाही.
मी त्या लोकांना पर्वतावरुन बघू शकतो.
    मी त्यांना उंच डोंगरावरुन बघतो.
ते लोक एकटे राहतात.
    ते दुसऱ्या देशाचा भाग नाहीत.
10 याकोबची माणसे कोण मोजू शकेल?
    ते धुळीच्या कणांइतके असंख्य आहेत.
    त्यांचा चौथा हिस्सा देखील कोणी मोजू शकणार नाही.
मला चांगल्या माणसाप्रमाणे मरु दे.
    त्यांच्या प्रमाणेच माझ्या आयुष्याचा शेवट सुखी होऊ दे.”

11 बालाक बलामला म्हणाला, “तू हे काय केलेस? माझ्या शत्रूंविरुद्ध बोलण्यासाठी मी तुला येथे आणले. पण तू तर त्यांना आशीर्वाद दिलास.”

12 पण बलाम म्हणाला, “परमेश्वर जे सांगले तेच मी बोलायला पाहिजे.”

13 नंतर बालाक त्याला म्हणाला, “म्हणून माझ्याबरोबर दुसऱ्या जागी ये. तिथून तुला ह्यातील आणखी बरेच लोक दिसू शकतील. तू त्या सगव्व्यांना बघू शकणार नाहीस. पण त्यांचा काही भाग तुला दिसू शकेल. कदाचित त्या जागेवरुन तू त्यांच्याविरुद्ध माझ्यासाठी काही बोलू शकशील.” 14 तेव्हा बालाक बलामला पिसगाच्या माथ्यावरील सोकिमाच्या माव्व्यावर [a] घेऊन गेला. तेथे बालाकने सात वेद्या बांधल्या. नंतर बालाकने प्रत्येक वेदीवर एक बैल आणि एक मेंढा बळी दिला.

15 तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, “या वेदीजवळ थांब. मी तिकडे जाऊन देवाला भेटून येतो.”

16 परमेश्वर बलामकडे आला आणि काय बोलायचे ते त्याने त्याला सांगितले. नंतर परमेश्वराने बलामला बालाकाकडे जायला सांगितले. आणि त्याने सांगितलेलेच बोलायला सांगितले. 17 म्हणून बलाम बलाकाकडे परत गेला. बालाक वेदीजवळच उभा होता. मवाबचे पुढारी त्याच्या जवळ होते. बालाकने बलामला येताना पाहिले. आणि तो म्हणाला, “परमेश्वराने काय सांगितले?”

बलामचा दुसरा संदेश

18 नंतर बलाम या गोष्टी म्हणाला,

“बालाका उभा रहा आणि मी काय सांगतो ते ऐक.
    सिप्पोरेच्या मुला, बालाका, मी सांगतो ते ऐकः
19 देव माणूस नाही.
    तो खोटे बोलणार नाही.
देव म्हणजे काही माणूस नाही.
    त्याचे निर्णय बदलणार नाहीत.
जर परमेश्वराने सांगितले की तो एखादी गोष्ट करील.
    तर तो ती करीलच.
जर परमेश्वराने वचन दिले तर
    तो ते वचन दिलेली गोष्ट करीलच.
20 परमेश्वराने मला त्या लोकांना आशीर्वाद द्यायला सांगितले,
    परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला.
    म्हणून मी ते बदलू शकत नाही.
21 देवाला याकोबाच्या माणसात काही चूक दिसली नाही.
    इस्राएल लोकांमध्ये देवाला पाप दिसले नाही.
परमेश्वर त्यांचा देव आहे
    आणि तो त्यांच्या बरोबर आहे.
    थोर राजा त्यांच्या बरोबर आहे.
22 देवाने त्या लोकांना मिसर देशातून आणले.
    ते रानबैला इतके शक्तिमान आहेत.
23 याकोबाच्या माणसांचा पराभव करु शकेल अशी कोणतीही शक्ति नाही.
    इस्राएल लोकांना थोपवू शकेल अशी कोणतीही जादू नाही.
लोक याकोबाबद्दल आणि इस्राएल लोकांबद्दल असे म्हणतील:
    ‘देवाने केलेल्या महान गोष्टी बघा.’
24 ते लोक सिंहासारखे शक्तिमान आहेत.
    ते सिंहासारखे उठत आहेत.
तो सिंह शत्रूला खाऊन टाकल्या खेरीज विश्रांती घेणार नाही.
    तो सिंह त्याच्याविरुद्ध असलेल्या लोकांचे रक्त प्यायल्या खेरीज विश्रांती घेणार नाही.”

25 नंतर बालाक बलामला म्हणाला, “त्या लोकांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी व्हाव्यात असे तू म्हटले नाहीस. पण त्यांच्या बाबतीत वाईट घडावे असेही तू म्हटले नाहीस.”

26 बलाम उत्तरला, “मी तुला आधीच सांगितले होते की परमेश्वर जे सांगले तेच मला बोलता येईल.”

27 नंतर बालाक बलामला म्हणाला, “तेव्हा माझ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी ये. कदाचित देव आनंदी होईल आणि तुल्या त्या लोकांना शाप द्यायची परवानगी देईल.” 28 म्हणून बालाक बलामला घेऊन पौर पर्वताच्या माथ्यावर गेला. या पर्वतावरुन वाळवंट दिसते.

29 बलाम म्हणाला, “इथे सात वेद्या बांध. नंतर सात बैल आणि सात मेंढे बळी देण्यासाठी तयार कर.” 30 बलामने सांगितल्याप्रमाणे बालाकाने साऱ्या गोष्टी केल्या. बालाकाने वेदीवर बैल आणि मेंढे बळी दिले.

Footnotes:

  1. गणना 23:14 सोकिमाच्या माव्व्यावर किंवा सोकीमचे शेत.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes