A A A A A
Bible Book List

उत्पत्ति 46 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

देव इस्राएलास अभयवचन देतो

46 अशा रीतीने इस्राएलाने मिसरच्या प्रवासास सुरवात केली. प्रथम तो बैरशेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाची उपासना केली व देवाला अर्पणे वाहिली. रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला. तो म्हणाला, “याकोबा, याकोबा!”

आणि इस्राएलाने उत्तर दिले, “हा मी आहे, काय आज्ञा?”

देव म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे; पाहा, मिसर देशास जाण्यास तू भिऊ नको जाताना मी तुझ्याबरोबर येईन, आणि तुझ्या संततीस मी मिसरमधून पुन्हा बाहेर आणीन; तू मिसरमध्ये मरण पावशील परंतु मरण्याच्या वेळी योसेफ तुझ्याजवळ असेल; तू मरण पावशील तेव्हा तो आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.”

इस्राएल मिसर ला जातो

मग इस्राएल (याकोब) बैरशेबा सोडून मिसरच्या प्रवासास निघाला. त्याच्या मुलांनी आपला बाप, आपल्या बायका व मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाडयातून मिसरला आणले. 6-7 त्याच प्रमाणे त्यांनी आपली शेरडेमेंढरे गुरेढोरे आणि कनान देशात त्यांनी मिळवलेले सर्वकाही मिसरला नेले. अशा रीतीने इस्राएल आपल्या कुटुंबातील सर्वांना म्हणजे आपले मुलगे व नातू, आपल्या मुली व नाती या सर्वांना घेऊन मिसरला गेला.

याकोबाची संतती

इस्राएलाचे जे मुलगे आणि नातवंडे त्याच्याबरोबर मिसरला गेले त्याची नावे अशी-

याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन होता. रऊबेनाचे मुलगे; हलोक, पल्लू, हेस्रोन, व कार्मी

10 शिमोनाचे मुलगे; यमुवेल, यामीन, ओहाद, याकोन, सोहार आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल.

11 लेवीचे मुलगे: गेर्षेन, कहाथ व मरारी.

12 यहूदाचे मुलगे; एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह; यापैकी एर व ओनान हे कनान देशात मरण पावले; पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल.

13 इस्साखाराचे मुलगे; तोला, पुवा, योब व शिम्रोन.

14 जबुलूनाचे मुलगे; सेरेद, एलोन व याहलेल.

15 हे सहा मुलगे व मुलगी दीना ही लेकरे याकोबापासून लेआला पदन-अरामात झाली; त्या कुटुंबात तेहतीस जण होते.

16 गाद याचे मुलगे: सिफयोन, हगी, शूनी, एसबोन, एरी, अरोदी व अरेली.

17 आशेराचे मुलगे: इम्ना, इश्बा, इश्वी व बरीया; आणि त्याची बहीण सेराह; बरीयाचे मुलगे हेबेर व मालकीएल.

18 जिल्पा ह्या बायकोपासून झालेले हे सगळे याकोबाचे मुलगे होते. (लाबानने आपली मुलगी लीआ हिला जिल्पा दिली होती.) एकंदर त्या कुटुंबात सोळा माणसे होती.

19 योसेफ व बन्यामीन हे याकोबाची बायको राहेल हिचे मुलगे होते.

20 योसेफास मिसर देशातील ओन नगराचा याजक पोटीफरा याची मुलगी आसनथ हिच्या पोटी मनश्शे व एफ्राईम हे मुलगे झाले.

21 बन्यामीनाचे मुलगे; बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.

22 योसेफ व बन्यामीन, याकोबापासून राहेलीस झाले व त्यांना झालेली संतती मिळून ते सर्व चौदा जण ह्या कुटुंबात होते.

23 दान याचा मुलगा हुशीम होता

24 नफतालीचे मुलगे; यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम हे होते.

25 लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हेचे याकोबापासून झालेले मुलगे दान व नफताली आणि त्यांना झालेली संतती असे हे सात जण त्या कुटुम्बात होते.

26 याकोबाच्या वंशातील जी माणसे मिसरमध्ये गेली ती याकोबाच्या मुलांच्या बायका सोडून सहासष्ट जण होती. 27 योसेफास मिसर देशात झालेले दोन मुलगे मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले सत्तर जण मिसर देशात होते.

इस्राएल मिसरमध्ये पोहोंचतो

28 याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली. 29 आपला बाप जवळ येत आहे असे योसेफास समजले; तेव्हा तो आपला रथ तयार करुन आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्याला सामोरा गेला. योसेफाने आपल्या बापास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यातगळा घालून तो बराच वेळ रडला.

30 मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मी शांतीने मरण पावेन; मी प्रत्यक्ष तुझे तोंड पाहिले आहे आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.”

31 मग योसेफ आपल्या भावांना व आपल्या बापाच्या घरच्या सर्वांस म्हणाला, “मी जाऊन फारोला सांगतो की ‘माझे भाऊ व माझ्या बापाच्या घरातील सर्व मंडळी हे कनान देश सोडून येथे माझ्याकडे आले आहेत; 32 माझ्या बापाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत. ते सतत शेरडेमेंढरे व गुरुढोरे पाळीत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरुढोरे पाळीत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.’ 33 जेव्हा फारो तुम्हाला बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?’ 34 तेव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. दुभती जनावरे पाळून आम्ही उपजिविका करतो. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते.’ मग फारो तुम्हाला गोशेन प्रातांत राहू देईल. मिसरच्या लोकांना मेंढपाळ आवडत नाहीत; म्हणून गोशेन प्रांतात राहणे तुमच्या फायद्याचे आहे.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes